बल्लाळेश्वर गणपती

बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायक पैकी तिसऱ्या नंबरचे मंदिर आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असिम भक्त होता. विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगू ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. फार प्राचीन काळी म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात (पाली गावात) कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदूमती काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा गणेशपूजना कडे अधिक ओढा दिसु लागला. हळूहळू त्यानेआपल्या मित्रांनाही गणेशभक्तिचे वेड लावले. बल्लाळच्या संगतीने मुले बिगडली अशी ओरड गावात सुरू झाली. लोक कल्याण शेटजी कडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलांना बिघडवले अशी तक्रार करु लागले. आपला मुलगा एवढ्या लहान वयात भक्तीमार्गाला लागला व त्याने आपल्या मित्रांनाही वाईट नादाला लावले. या विचाराने कल्याण शेटजीनां राग आला. त्यांनी बल्लाळला खूप मारले व रानात झाडाला वेलींनी बांधून ठेवले. थोड्या वेळाने बल्लाळचा धावा ऐकून गणेश ब्राह्मण रूपात प्रकट झाले. व त्याला आशीर्वाद दिला की त्यांच्याचभक्तांच्या नावाने ते इथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करतील.

FESTIVALS

Pratiksha Chitnis, Mumbai

8/29/20251 min read