वरदविनायक गणपती (चौथा गणपती)
अष्टविनायकांपैकी चौथा गणपती वरद विनायक हा रायगड जिल्ह्यातील महाड येथे आहे. इथे बाप्पा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे. इथे गणपतीची मूर्ती स्वयंभू म्हणजेच स्वतः प्रकट झालेली मानली जाते. मूर्तीचा चेहरा पूर्वेकडे असून, ती रक्षकाच्या स्वरूपात दिसते. मंदिराच्या गाभाऱ्यात दिवा नेहमीच अखंड प्रज्वलित असतो. या मंदिराच्या चारही बाजूंना चार हत्तींची स्थापना केलेली दिसते. ही मूर्ती १६९० साली मंदिराजवळ तळ्यात सापडली होती. स्थापन केलेल्या जागेवर सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी १७२५ साली मंदिराची स्थापना केली. या गणपतीला वरदान देणारा म्हणून वरदविनायक असे नाव पडले. येथे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केल्यास विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे. मंदिराच्या आजूबाजूला सुंदर सरोवर असून तीर्थरूप वातावरण लाभते. अष्टविनायक यात्रेत महाडचा वरद विनायक भक्तांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या मंदिरात वर्षभर गर्दी असतेच परंतु माघ महिन्यात भाविकांची संख्या वाढते.
Ketaki Pendase
8/30/20251 min read


Modi Script Learn
Explore ancient Modi script through engaging videos.
Learn
Discover
info@modiscriptlearn.com
+91 82085 65176
© 2025. All rights reserved.